मोदकांची मज्जा

            

सगळ्यांचे दु:ख दूर करुन आनंद आणणारा बाप्पा सगळयांचाच अगदी फेव्हरेट आहे. अशा या बाप्पाचे काहीच दिवसात होणार आहे आणि बाप्पाच्या आगमनाची मजा तर‌ आहेच… काय? गणेशचतुर्थीच्या दिवशी तो तब्बल १० दिवस पृथ्वीवर आपल्या सोबत असनार .. मग काय त्याच्या आगमनामुळे वातावरण एकदम बदलून जाते.. देशभरात उत्साहाचं,चैत्नयाचं असं वातावरण असतं. घरोघरी बाप्पाची आरास केली जाते. सार्वजनिक मंडळात बाप्पाच्या आगमनाची त्याच्या सेवेची जोरदार तयारी केली जाते.  बरोबरना म्हणूनच तुमच्यासाठी बाप्पा बद्दल काही विशेष . 

देशभरात गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात केले जाते. गणपतीची विविध रुपातील मूर्तींची घरी प्रतिष्ठापना केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाची आरती केली जाते.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दिवसात बाप्पाच्या आवडीने मस्त मोदक केले जातात. या शिवाय गोडधोड पदार्थांची रेलचेल असते ती वेगळीच म्हणा.. महाराष्ट्रात, देशभरात आणि परदेशात बाप्पाच्या रितीभाती थोड्याफार फरकाने वेगळ्या असतील. पण बाप्पावरील श्रद्धा, प्रेम मात्र तितकेच असते. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. घरी छान गोडधोड बनवले जाते. त्या निमित्ताने घरी पाहुण्यांची उठबस होते. सगळीकडे एकदम आनंदाचे वातावरण असते.

गणपती हा  बुद्धीचा ,अधिष्ठाता विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणपतीची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणपततीची मोठ्या प्रमाणावर पूजा व कार्यक्रम होतात.

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक.गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव प्रचलित आहे. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. 

पुरानात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाव प्राप्त झाले.भगवान गणेशाला दुर्वा प्रिय असल्याने त्यांच्या शिरावर वाहाण्याची प्रथा आहे.

त्याचप्रमाणे नैवैद्यात मोदक अतिप्रीय असल्याने गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.

वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट, विनायक आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.गणपतीला इतर काही नावे आहेत त्यांचे अर्थ असे वक्रतुण्ड म्हणजे “ज्याचे तोंड वक्र वा वाकडे आहे तो”.गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. महोदर या शब्दाचा अर्थ  मोठे उदर असणारा व लम्बोदर चा लंब वा लांबडे उदर असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वरशब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. 

घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात.संपुर्ण बाजारपेठ उपयोगी वस्तुंनी भरलेली दिसते. मुर्तीकारांची लगबग तर कित्येक महिने अगोदरपासुन सुरू झालेली पहायला मिळते.

कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो.

पण अनंत चतुर्दशी ला आपला लाड़का गणपती आपल्याला निरोप देऊन जातो. आपल्या लङ्क्या गणपती च विसर्जन करने खुप अवघड़ जाते ,पण तरीही खुप मोठ मन करून निरोप घेतो. 

डोळ्यात आले अश्रू,

बाप्पा आम्हाला नका विसरू..

आनंदमय करून चालले तुम्ही,

पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर!!!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने हा गणेशोत्सव सुरू केला होता आज तो उद्देश पुर्ण होतांना पहायला मिळत नाही. सगळीकडे मोठया आवाजात डी जे वाजवणे, बिभत्स नाचगाणी, मंडपात चित्रपट गितं वाजवणे, मोठमोठे मंडप बांधुन रोषणाई करून या पारंपारिक उत्सवाला ज्या पध्दतीने मेगा ईव्हेण्ट चे स्वरूप यावयास लागले आहे ते पाहाता लोकमान्यांना या उत्सवातुन नक्कीच हे अभिप्रेत नव्हते हे आपल्या लक्षात येते.

सामाजिक एकोपा वाढवुन चांगल्या विचारांची देवाण घेवाण करणे, गरजवंताना सहाय्य करणे, वक्र्तृत्व स्पर्धांचे, आणि इतर स्पर्धा आयोजित करून लोकांमधील चांगल्या गुणांचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे. तेव्हांच हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सफल होईल !!!

परेश श्रीखंडे

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *